कोल्हापूर

अंबाबाई ( मांड) उत्सव, हसूर दुमाला विशेष, हसूर दुमालाचे जागृत देवस्थान श्री अंबाबाई.

CD

पट्टी ः अंबाबाई (मांड) उत्सव, हसूर दुमाला, विशेष
---------------
जागृत देवस्थान
श्री अंबाबाई

करवीर परिसरात अनेक मंदिरे हेमाडपंथी आहेत. त्यामुळे परिसराला हेमाडपंथी मंदिराचे माहेरघर समजले जाते. करवीर तालुक्यातील तुळशी आणि भोगावती नद्यांच्या काठावर वसलेले हसूर दुमाला (ता. करवीर) येथील श्री अंबाबाई हे जागृत देवस्थान नावारूपाला आले. येथील मंदिर हेमाडपंथी आहे. अंबाबाई मांड उत्सव साजरा करण्याची परंपरा शेकडो वर्षांची आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी थाटात रंग सोहळ्यासह उत्सव साजरा होतो. या दिवशी घरोघरी पुरण-पोळीचा नैवैद्य केला जातो. यात्रेनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम होत असतात. बुधवारी रंगपंचमीला देवीच्या जागराची सांगता होत आहे. त्यानिमित्त......
---------------------------------------

हसूरची लोकसंख्या पाच हजार आहे. कुलकर्णी, इनामदार-पाटील, तेली, शेट्टी, ठाणेकर, गायकवाड, खाटकी, साळी या समाजातील वयोवृद्ध लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव सुरू केल्याचे आजही या गावातील ज्येष्ठ सांगतात. त्याकाळी पांडुरंग ठाणेकर, ज्ञानदेव ठाणेकर, दादू काजवे, विष्णू गायकवाड, दादू बागडी, गंगाराम शेटे, शंकर क्षीरसागर, बळवंत क्षीरसागर, काशिनाथ शेटे, विश्वनाथ शेटे, दादू शेटे, बाळू खाटकी, रामा साखरे, पंडित पाटील, सदाशिव शेटे या जाणकार लोकांनी एकत्र येऊन सात दिवसांचा उत्सव साजरा केला. देवस्थानची जागृती व महती गावासह परिसरातील लोकांना पटवून दिली. यातून अंबाबाई जागृत देवस्थानची महती परिसरातील लोकांना समजली.
पंचक्रोशीत अंबाबाई जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. ही देवी नवसाला पावते, अशी ख्याती आहे. त्यामुळे रंगपंचमीला महादेव, गणपती, सरस्वती, लक्ष्मी-सरस्वती, मारुती व इतर देवतांची सोंगे वयोवृद्ध मंडळी काढत असतात. सोंगे काढण्याची परंपरा आजही अखंडित सुरू आहे. दरवर्षी अंबाबाईची पालखी कात्यायनी देवीच्या भेटीला जाते. पालखी सोहळ्यात घराघरांतील भाविक सोहळ्यात सहभागी होतात. गावामध्ये दसरा, श्रावण, रंगपंचमी, गुढीपाडवा व अक्षयतृतीयाला अंबाबाईचा उदो उदो होतो. तसेच हा उत्सव विठलाई मांड म्हणून समजला जातो. कारण मांडाची सुरुवात हसूर दुमालातून होते व हसूर येथील अंबाबाईचे मांडाचे मानाचे तोरण विठलाईदेवी (दुर्गमानवाड) येथे जाते. पूर्वी उत्सवात नऊ दिवस तमाशांचा कार्यक्रम होत असे.
आजही तमाशाद्वारे ही परंपरा अखंडित आहे कै. दत्तू बारवाडे (हसूर) व यशवंत डोंगरकर या कलाकारांनी १० ते १५ वर्षे या गावची कलेच्या माध्यमातून सेवा केली आहे. आजही कै. यशवंत डोंगरकर या कलाकाराची मुलगी भागीरथी यशवंत डोंगरकर या कळसाचा मान घेण्यासाठी हसूर गावी येतात. काही वर्षांत वसंत काजवे, वासुदेव ठाणेकर, पांडुरंग क्षीरसागर, बबन लांडगे, रामचंद्र काजवे, महादेव शेटे, शिवलिंग क्षीरसागर, कै. मारुती खराडे, (यमाजी) दत्तात्रय गायकवाड आदींचे यात्रेला योगदान लाभत होते. नवरात्र उत्सव काळात देवीची विविध रूपांत पूजा बांधली जाते. तसेच श्रावण पिठोरी अमावास्येला काळम्मा डोंगरावर अंबाबाईच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. रंगपचमीदिवशी यात्रा कमिटीतर्फे गावातील देवांना रंग घालण्यासाठी ट्रॅक्टरमधून वाटप केले जाते. यामध्ये शाहू तालीम मंडळाची मानाची सासनकाठी पुढे असते. ही सासनकाठी गुढीपाडव्याच्या दिवशी उतरवली जाते. देवीला गाऱ्हाणी घालण्यासाठी इतर तरुण मंडळांचे झांजपथक अग्रस्थानी असते. उत्सवात मानाचे सोंग घेऊन उत्सवाची शोभा वाढविणारे आणि आजही परंपरा राखणारे दिनकर ठाणेकर, शंकर ठाणेकर, प्रज्योत लांडगे, मधुकर खाटकी, कै. श्रीपती फडतारे, सुनील शेटे, कै. नामदेव के. पाटील, आनंदा बांदेकर, सखाराम खराडे, रामा फडतारे, रंगराव कोडी-पाटील, श्रीपती भोईटे, प्रकाश बुराड, शामराव पोवार, धनाजी परीट, भागीरथी यशवंत होंगरकर या कलाकारांना गावातील लोकांचे सहकार्य लाभते. यामध्ये बाबूराव सुतार, मारुती कांबळे, सदाशिव पानारी, रामा सुतार, प्रभाकर सुतार, संदीप बंडोपंत सुतार, आनंदा ताटे, हिंदुराव लाड, सदाशिव भोईटे या कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले. दुसऱ्या दिवशी सकाळी भोसले, इनामदारांच्या घरी गौळणीचा कार्यक्रम होतो. तसेच श्रीकांत कुलकर्णी व कमलाकर यांच्या घरी गौळणीचा कार्यक्रम होतो. त्यानंतर डॉ. कुलकर्णी यांच्या घरी मान दिला जातो. त्यानंतर मानाने अंबाबाईचा कळस देवालयामध्ये आणला जातो व तेथे आरती, गौळण व भैरवी होते. सलग पंधरा दिवस चालणाऱ्या या अंबाबाईच्या रंग उत्सवासाठी पंडित ठाणेकर, चंद्रकांत शेटे, रवींद्र क्षीरसागर, साईनाथ पाटील, महादेव झांजगे, धनाजी परीट, अनिल शेटे, योगेश क्षीरसागर, राजाराम पाटील, सागर सुतार, आनंदा शेटे, दिगंबर कांबळे, राजाराम ठाणेकर, शामराव पोवार, पांडुरंग भोईटे, प्रज्योत लांडगे, बाळू गणू परीट, दिगंबर क्षीरसागर, यशवंत ठाणेकर, दत्तात्रय पांडुरंग भोईटे, शौकतभाई मुजावर, राजेखान मुजावर या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. ग्रामदैवत अंबाबाईचा उत्सव पार पाडण्यासाठी हसूर दुमालाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे सदस्य, पदाधिकारी, तरुण मंडळाचे, ग्रामस्थांचे सहकार्य लाभते.
-------------------

चौकट
ट्रॅक्टरमधून रंग वाटप
रंगपंचमीदिवशी यात्रा कमिटीतर्फे गावातील देवांना रंग घालण्यासाठी ट्रॅक्टरमधून रंगांचे वाटप केले जाते. यामध्ये शाहू तालीम मंडळाची मानाची सासनकाठी पुढे असते. ही सासनकाठी गुढीपाडव्याच्या दिवशी उतरवली जाते.

- पुरवणी संकलन
- सुरेश पाटील, सोनाळी (ता. करवीर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT