कोल्हापूर

भाजी विक्रेत्या महिलेवर व्यवसाय वादातून खुरप्याने वार महिला गंभीर जखमी

CD

भाजी विक्रेत्या महिलेवर
व्यवसाय वादातून खुरप्याने वार

सेनापती कापशी, ता. १०: येथील आक्काताई तानाजी शिंदे (वय ५५) या भाजी विक्रेत्या महिलेवर व्यवसायाच्या वादातून खुनी हल्ला करण्यात आला. ही महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. संशयित हल्लेखोर शंकर कृष्णा माळी (रा. सेनापती कापशी, वय ७५) याला मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आक्काताई शिंदे व शंकर माळी यांचा येथील संताजीनगर चौकात भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. आज सकाळी हे दोघे निपाणीकडे एकाच वाहनातून सौद्याच्या भाजीपाला खरेदीला निपाणीकडे जात होते. या दोघांत खूप दिवसांपासून भाजी विक्रीच्या जागेचा वाद व ग्राहक मिळवण्याची चढाओढ होती. वाहनातून जात असताना दोघांमध्ये वादाला सुरवात झाली. वाद वाढतच गेला. माळी यांनी कुडिटेक जैन्याळ येथे गाडी आली असताना शिंदे यांच्यावर खुरप्याने वार करुन जखमी केले. शिंदे या गंभीर जखमी झाल्याने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, हवालदार नारायण देसाई, संदीप ढेकळे, अमर पाटील, राहुल देसाई आदी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT