कोल्हापूर

आलाबाद-मुरगूड रस्त्याचे काम गतीने

CD

02563
मासा बेलेवाडी ः आलाबाद ते मुरगूड रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरणाचे काम गतीने सुरू आहे. (छायाचित्र ः सार्थक फोटो, कापशी)
........
आलाबाद-मुरगूड रस्त्याचे काम गतीने

रुंदीकरणासह डांबरीकरण सुरू; वाहनधारकांतून समाधान व्यक्त

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. १५ ः वाहतुकीची वर्दळ आणि केवळ साडेतीन मीटर रुंदीचा रस्ता, बाजूपट्ट्या नावापुरत्याच उरलेल्या, अशा मुरगूड ते कापशी मार्गावर वाहन चालविणे कसरतीचे झाले होते. अनेक वर्षांच्या मागणीला यश आले आणि अर्थसंकल्पीय तरतुदीतून या रस्त्याच्या कामाला गती आली आहे. त्यापैकी आलाबाद-मुरगूड रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या परिसरातून सरसेनापती संताजी घोरपडे, बिद्री आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना यांची ऊस वाहतूक होते. याशिवाय गडहिंग्लज, कापशी, मुरगूड या शहरांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या मोठी असते. मात्र, आलाबादपासून मुरगूड हा रस्ता केवळ साडेतीन मीटर रुंदीचा होता. येथील बाजूपट्ट्याही तूटून गेल्या होत्या. या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाची अनेकवेळा मागणी झाली. अखेर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पिय तरतूदीतून साडेनऊ कोटी रुपये मंजूर झाले आणि या रस्त्याच्या कामाला गती आली.
मुरगूड ते आलाबाद हा साडेबारा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. त्यापैकी मुरगूडपासून हळदवडेपर्यंतच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये, त्यातील दौलतवाडी गावठाणच्या हद्दीत काँक्रिट रस्त्यासह गटारी अशी तरतूद आहे. हळदवडेपासून मासा बेलेवाडीपर्यंत रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी अडीच कोटी आणि मासा बेलेवाडी ते आलाबादपर्यंत रुंदीकरणासह मजबुतीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. साडेपाच मीटर रुंदीच्या या रस्त्याचे काम गतीने सुरू असून, काम दर्जेदार होणे गरजेचे आहे.
......
कोट...
आलाबाद ते मुरगूड मार्गावर हळदवडे गावाजवळ ३०० मीटर अंतर वन विभागाच्या हद्दीतून येते. त्यांच्या परवानगीची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. यामुळे या ३०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. येथे पूर्वीप्रमाणेच रस्ता होणार आहे. मात्र, त्याची दुरुस्ती होईल.
- सी. ए. पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT