कागल विधानसभा संयोजक
प्रमुखपदी परशुराम तावरे
सेनापती कापशी, ता. ३ : भाजप कागल विधानसभा संयोजकप्रमुखपदी परशुराम तावरे यांची निवड करण्यात आली. भाजपच्या कागल येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी तावरे यांना निवडीचे पत्र दिले. मेट्रो पार्क कागलचे अध्यक्ष भरत पाटील यांची महायुतीचे भाजप समन्वयक म्हणून, तर कागल तालुका भाजप अध्यक्षपदी एकनाथ पाटील यांनाही निवडीचे पत्र दिले.
निवडीनंतर परशुराम तावरे म्हणाले, ‘२०१४ मध्ये मी भाजपतर्फे कागल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. २०१६ ते २०१९ पर्यंत भाजपचा तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा नियोजन समितीवरही काम केले.’ यावेळी बेळगावचे माजी आमदार संजय पाटील, राज्य संघटक महेश उपस्थित होते. निवडीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.