कॉंक्रिट रस्त्यांचा
‘कागल’ला आज प्रारंभ
सेनापती कापशी, ता. २६ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दुस-या टप्प्यातील कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या कामाचा प्रारंभ उद्या (गुरुवारी) बोळावीवाडी (ता. कागल) येथे होईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते कामाचा प्रारंभ होईल.
मंजूर रस्ते व निधी ः मासा बेलेवाडी, बोळावीवाडी, बोळावी ते भुदरगड तालुक्यातील नांगरगाव हद्दीपर्यंत सहा किमी (सात कोटी ६० लाख), शेंडूर ते हदनाळ २.५ किमी (चार कोटी ६० लाख), कुरुकली ते बेनिक्रे ३.४ किमी (तीन कोटी ८० लाख) कसबा सांगाव ते पंचतारांकीत औद्योगिक वसाहत ते तळंदगे २.७ किमी (चार कोटी १० लाख) आणि बेलवळे खुर्द, पिराचीवाडी ते सावर्डे बुद्रुक ९.४ किमी (१२ कोटी ६० लाख). गिजवणे-कडगाव जिल्हापरिषद मतदार संघः गडहिंग्लज शहर मेटाचा मार्ग ते हत्ती बसवाना रस्ता २.२ किमी (तीन कोटी), इंचनाळ ते ऐनापूर २.९ किमी (तीन कोटी ९० लाख), कडगाव येथे विठ्ठलाईदेवी रस्ता २.७ किमी (तीन कोटी ९० लाख), प्रमुख जिल्हामार्ग ८३ ते हिरलगे रस्ता ३.७ किमी (तीन कोटी २५ लाख), उत्तूर जिल्हापरिषद मतदारसंघ ः चिमणे ते बेलेवाडी हुबळगी ५.२ किमी. (सात कोटी पाच लाख).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.