कोल्हापूर

शेताच्या वाटेवरील मोरीपूलांची डागडुजी

CD

3135
तमनाकवाडा : खासगी मोरीपूल बांधताना शेतकरी. (छायाचित्र : सार्थक फोटो, कापशी)
......
शेतवाटेवरील मोरी पुलांची
तमनाकवाड्यात डागडुजी

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. ११ : गेले आठवडाभर पावसाने उसंत दिल्याने शेतीमशागत आणि पेरणीच्या कामाला गती आली आहे. पिके काढताना पाणंद रस्त्यांची कामे केली जातात. त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी शेताकडे जाणाऱ्या वाटेवरील मोरीपुलांची काळजी घ्यावी लागते. शेतीकामाबरोबरच ही कामेसुद्धा सुरू आहेत.
मॉन्सून पाऊस सुरू झाला की, ओढ्यापलीकडील शेतीकडे जाणे शेतकऱ्यांना अडचणीचे होते. यासाठी परिसरातील सहकारी साखऱ कारखाने आणि विविध शासकीय योजनांमधून रस्त्याबरोबरच मोरीपुलांच्या दुरुस्तीची मागणी होते. मात्र, अनेक ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांना वर्गणी काढून अशा प्रकारचे पाणंद रस्ते आणि मोरीपूल तयार करावे लागतात. मे महिन्यापासून मॉन्सूनपूर्व पावसाने ओढ्यानाल्यांना पाणी केले. ऊसशेतीसाठी हा पाऊस चांगला झाला असला, तरी इतर पिकांच्या पेरण्या मात्र खोळंबल्या. अनेक ठिकाणी वाफसा नसल्याने मशागत नाही आणि पर्यायाने पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या आठवड्यात काही प्रमाणात पावसाने उसंत दिल्याने मशागतीपाठोपाठच पेरणीला गती आली. यामध्ये विशेषतः सोयाबीन पेरणी सुरू आहे. याचवेळी अनेक ठिकाणी मोठ्या पावसाने पाणंद रस्ते खचल्याने पावसाअगोदर त्यावर मरून टाकून दुरुस्ती सुरू आहे. गावापासून ओढ्याच्या पलीकडील शेताकडे जाण्यासाठी खासगी हद्दीत नळ टाकून लहानलहान मोरीपूल बनवले जात आहेत. यासाठीही शेतकऱ्यांनाच वर्गणी काढून काम करावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

SCROLL FOR NEXT