03690
झुलपेवाडी ः चिकोत्रा प्रकल्पात आतापर्यंत ९० टक्के पाणीसाठा झाला. (सार्थक फोटो, कापशी)
--
चिकोत्रा प्रकल्प अद्याप भरण्याची प्रतीक्षाच
पाणीसाठा ९१ टक्केच; खो-यातील शेतक-यांची चिंता कायम
प्रकाश कोकितकर ः सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. ९ : यंदा सप्टेंबरचा दुसरा आठवडा उजाडला तरी झुलपेवाडी येथील चिकोत्रा प्रकल्प भरण्याची चिंता कायम आहे. प्रकल्पापासून बेळुंकीपर्यंत साडेपाच हजार हेक्टर जमिनीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी याच प्रकल्पाचा आधार आहे, म्हणूनच प्रकल्प भरला का? याकडे शेतक-यांचे लक्ष असते. गेल्या वर्षीचा शिल्लक पाणीसाठा ३० टक्के होता. यावर्षी पाऊस २४६९ मिलीमीटर झाला आणि पाणीसाठा ९१.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आजरा तालुक्यातील झुलपेवाडीपासून कागल तालुक्यातील बेळुंकीपर्यंतच्या चिकोत्रा नदीकाठावरील सुमारे ३२ गावांसाठी पाण्याचे महत्त्व आहे. सुमारे
साडेपाच हजार हेक्टर शेती प्रकल्पावर अवलंबून आहे. यावर्षी उशिरा सुरू झालेला मॉन्सून बरसलाही कमीच. तरीही राज्यातील बहुतेक धरणे भरली. चिकोत्रा मात्र अजूनही उंबरठ्यावर आहे. आता उर्वरित मॉन्सून अथवा परतीच्या पावसाने भरेल, अशी अटकळ आहे. त्यामुळे शेतकरी काहीअंशी चिंतेतच आहेत.
प्रकल्प त्वरित भरला जावा, यासाठी दोन बांध घालून आरळगुंडी पठारावरून पश्चिमेकडे जाणारे पाणी अडवून ते चिकोत्राकडे वळवले होते.
२०१८ पासून २०२२ पर्यंत सलग पाचवेळा, २०२५ मध्ये आणि त्यापूर्वी २००० पासून तीनवेळा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. प्रकल्पातील आवर्तनानुसार सोडलेले पाणी चिकोत्रा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या २८ बंधा-यात साठवून शेतकरी शेतीला पाणी मिळवतात. विविध गावांच्या नळयोजनांनाही याच प्रकल्पातून जॅकवेलला पाणी मिळते. प्रकल्प ज्यावर्षी पूर्ण भरला नाही, त्यावर्षी उपसाबंदी दीर्घकाळ सहन करावी लागते. त्यामुळे नळयोजनांसह शेतीला पाणी मिळवणे अधिक कष्टप्रद होते. पिके वाळून फटका बसतो.
चौकट-
चिकोत्रा क्षेत्रातील वर्षनिहाय पाऊस :
- २०२१ - २५०० मिमी
- २०२२ - २४२८ मिमी
- २०२३ - १९९९ मिमी
- २०२४ - ३०२९ मिमी
- २०२५ - ३३०० मिमी
- २०२६ - २४६९ मिमी
-
SNK26B03690
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.