कोल्हापूर

शाळकरी मुलांनी राबवली स्वच्छता मोहिम

CD

सकाळ वृत्तसेवा
शाहू नाका, ता. ३ ः प्रशासनाकडून वेळेत कचरा उठाव होत नसल्याने ग्रीन पार्क येथील खुल्या जागेत कचरा व टाकाऊ साहित्य पडल्याने मुलांना खेळताना अडचणी येत होत्या. आपणच जागा स्वच्छ केल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन शाळकरी मुलांनी बुधवारी खुल्या जागेत स्वच्छता मोहीम राबवली.
शहरासह उपनगरात कचरा उठावांची समस्या गंभीर बनत आहे. घरातील कचरा वेळेत उठाव होत नसल्याने काहीजण खुल्या जागेमध्ये सुका कचरा, खरकटे तसेच टाकावू साहित्य टाकले जात आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढत आहे. यामुळे खुल्या जागेत मुलांना खेळताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते. प्रशासनाकडे तक्रार करूनही डोळेझाक होत असल्याने बुधवारी ग्रीन पार्क व वनराई पार्क येथील शाळकरी मुलांनी खुल्या जागेत स्वच्छता मोहीम राबविली. उपक्रमात कृष्णराज पाटील, कनिष्का कदम, विराज चव्हाण, अद्वैत नरके, वैभव शिंदे, वेदिका चव्हाण, आराध्या आठरापोळे, पृथ्वीराज तळगडी, राणोजी शिंदे, धनराज शिंदे या शाळकरी मुलांनी स्वच्छता मोहीम राबवली.
-------------------------------------------------
शाहू नाका ः ग्रीन पार्क येथील खुल्या जागेची स्वच्छता मोहिमेत सहभागी शाळकरी मुले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू; किती आणि का?

YouTube Shorts पाहण्याचं व्यसन लागलंय? मिनिटात मिळेल सुटका; गुगलकडून '0 Minute' चा पर्याय..हे नेमकं कसं वापरायचं पाहा

Loni Kalbhor News : कोचिंग क्लासला गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय

Melbourne Vasai Easter Fest: मेलबर्नमध्ये वसईची परंपरा कायम: २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्यात लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

SCROLL FOR NEXT