कोल्हापूर

सरवडे

CD

फोटो
...

ट्रॅक्टर कालव्यात पडून चालक ठार
---
तळाशी येथे अस्तरीकरणाच्या कामावर दुर्घटना
सरवडे, ता. १७ : राधानगरी तालुक्यातील तळाशी येथे कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. सध्या पाणी सोडल्याने काम बंद आहे. या रस्त्यावरील कच्च्या मार्गाने जाताना आज दुपारी कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटल्याने चालक सुरेश ऊर्फ सतीश बळवंत पाटील (वय २८, रा. तळाशी) याचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी ः दोन महिन्यांपासून दूधगंगा नदीवरील डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवरून कालव्याला पाणी सोडल्याने गेले तीन दिवस काम बंद होते. या कामावर पाणी मारण्यासाठी आणि चालक म्हणून सतीश पाटील हा दोन महिन्यांपासून काम करीत होता. आज दुपारी दोनच्या दरम्यान कालव्यावरील कच्च्या रस्त्यावरून ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन जाताना कालव्यात ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. यात चालक सतीश हा पाण्यात ट्रॅक्टरखाली सापडला. गंभीर दुखापत झाल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. ग्रामस्थांना घटनेची माहिती समजताच जखमी अवस्थेत त्याला बाहेर काढण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ त्याला उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तो अविवाहित होता. त्याच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT