कोल्हापूर

आंदोलनात सहभागी व्हा

CD

संच मान्यतेविरोधातातील
आंदोलनात सहभागी व्हा

राधानगरी तालुकाध्यक्ष वागरे, सरचिटणीस पाटील यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता. ११ : संच मान्यतेच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरून शाळांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यायाने सरकारी शाळा बंद पडून बहुजनांचे शिक्षण संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी १५ जूनला शिक्षक समिती राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. सर्व शिक्षकांनी या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समितीचे राधानगरी तालुकाध्यक्ष विक्रम वागरे व सरचिटणीस विकास पाटील यांनी केले आहे.
संच मान्यतेच्या नवीन शासन निर्णयामुळे अनेक शाळेतील मुख्याध्यापक पद रद्द होणार असल्याने शाळांना प्रशासनप्रमुखच उरणार नाही. त्याशिवाय नव्याने लादलेल्या जाचक अटींमुळे पटाअभावी जर एखाद्या शाळेत शिक्षक अतिरिक्त झाला तर पुन्हा पट वाढला तरी त्या शाळेत नवा शिक्षक मिळणे कठीण बनले आहे. अशा निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मुलांचा सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क हिरावला जाऊन खासगी शाळांचे पेव फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारी प्राथमिक शाळा टिकाव्यात, यासाठी या वर्षाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी १५ जूनला प्राथमिक शिक्षक राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे. सर्व शिक्षकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, तसेच समाजातील सूज्ञ नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन वागरे व पाटील यांनी केले आहे.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT