कोल्हापूर

सरवडे

CD

मारुतीराव जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार
सरवडे, ता. ३० : राधानगरी तालुक्यातील डाव्या आघाडीचे जेष्ठ नेते आणि संत साहित्याचे अभ्यासक मारुतीराव जाधव गुरुजी त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. ३०) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जाधव गुरुजींचे रविवारी निधन झाले होते. सोमवारी पार्थिव तळाशीत आणून अंत्यदर्शनासाठी घरी ठेवले होते. त्यानंतर ट्रॅक्टरमधून मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा सुरू झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात तळाशी फाटा येथे आणली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अरुण जाधव यांनी भडाग्नी दिला. यावेळी शोकसभेत आदरांजली वाहताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी, मारुतीराव जाधव यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी, अभ्यासू व्यक्तिमत्व निघून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या. माजी आमदार के. पी. पाटील यांनी मारुतीराव जाधव यांच्या जाण्याने अभ्यासू व्यक्ती हरपल्याचे सांगितले. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील, नेते ए. वाय. पाटील, राजन गवस, नंदकुमार मोरे, सुदाम कांबळे, विठ्ठलराव खोराटे, चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील, वसंतराव पाटील, मुख्याध्यापक आर. बी. खामकर, जोतीराम पाटील, शरद पाडळकर, प्रमोद तौंदकर यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी बिद्रीचे संचालक उमेशराव भोईटे, के. जी. नांदेकर, आर. के. मोरे, रमेश वारके, वीरेंद्र मंडलिक, अभिजित तायशेटे, नंदकुमार देंगे, अशोक फराकटे, रविश पाटील, नाना पाटील, नेताजी पाटील, रवीश पाटील, उमेश भोईटे, युवराज वारके, वीरेंद्र मंडलिक, नंदकिशोर सूर्यवंशी, नंदू ढेंगे, दत्तात्रय उगले, के. जी. नांदेकर, मधुकर देसाई, जालंदर पाटील, लेमनराव निकम, सदाशिव चव्हाण यांच्यासह विविध गावांचे सरपंच, संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT