आकनूरला उद्यापासून
विठ्ठलाईदेवी यात्रा, मांड
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथे रविवारी (ता. ३०) व सोमवारी (ता. ३१) श्री विठ्ठलाई यात्रा आणि मांड कार्यक्रम होणार आहे. धुळवडीच्या पौर्णिमेपासून चैत्रारंभापर्यंत म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत आधुनिक काळात स्थानिक आणि परंपरागत खेळेमंडळी तब्बल १५ दिवस मांड जागवतात. पंधरा दिवसात मांड जागवणे व धार्मिक कार्यक्रम पार पाडण्याची तीन पिढ्यांची परंपरा कायम आहे.
३० रोजी पहाटे गुढी उभारणे, लिंब-गूळ खाणे, गुढीपाडवा वाचन, दिवसभर धार्मिक सोंगांचे दर्शन, सायंकाळी पारंपरिक वाद्ये, करंडी वाद्य, लेझीम व ढोलताश्यांच्या गजरात गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत नवसाचे दंडवत नवसभेट, तोरण अर्पण सोहळा तसेच आगमन, जागर, मांड पूजन तर रात्री विठ्ठलाई देवीचा मांड जागवणे म्हणजेच रात्रीपासून सकाळपर्यंत देवीदेवतांची सोंगे, गणगवळण, हिंदी मराठी गीतांचे कलाविष्कार, समाज प्रबोधनात्मक व पारंपरिक वग कार्यक्रम. सोमवारी गोपाळ सोंगाने तमाशा समाप्ती केला जातो. त्यानंतर नवसाची गार्हाणी, यात्रेची सांगता नवस बोलीने होईल. कार्यक्रमाचे देवपूजा पाटील, समिती सदस्य, बारा बलुतेदार व ग्रामस्थ नेटके नियोजन करतात. भाविक भक्त, चाकरमानी व माहेरवाशिणींनी सहभाग घ्यावा; असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.