कोल्हापूर

मांजरखिंड रस्त्याची दुर्दशा

CD

5368
मांजरखिंड ते काळम्मावाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
..........
मांजरखिंड-काळम्मावाडी
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता. २५ : मांजरखिंड ते काळम्मावाडी (दूधगंगानगर) रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काळम्मावाडी धरण व परिसर पर्यटनदृष्ट्या सुंदर व निसर्गरम्य ठिकाण आहे. तसे मांजरखिंड हे अभयारण्य स्वागत कमानीचे ठिकाण असल्यामुळे याठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. परंतु या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी पर्यटक व नागरिकांमधून होत आहे.
राधानगरी तालुक्यात दमदार पावसामुळे डोंगरदरे हिरवेगार झाले आहेत. डोंगरावरून पडणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि मॉन्सूनचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी राधानगरी तालुक्यात वर्षा पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अभयारण्याची स्वागत कमान असलेल्या मांजरखिंड ते काळम्मावाडी धरणापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं पर्यटकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणाचा जीव गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या मार्गावर खड्डे पडलेल्या ठिकाणी किमान मुरूम टाकून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. काळम्मावाडी ते मांजरखिंड रस्त्यासाठी सुमारे ६२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, पण वन विभागाने परवानगी न दिल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! मुख्यमंत्र्यांकडून मदत कार्याचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या विशेष सूचना

IND vs PAK Final: अर्शदीप सिंगच्या 'हातवाऱ्याने' पाकिस्तानींच्या बुडाला लागली आग; ICC कडे केली तक्रार, म्हणतात...

Mhada House: आधी मागणी नंतर घर! धूळखात पडून राहणाऱ्या घरांवर उतारा, म्हाडाचा निर्णय

IND vs PAK Final Live: अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या यांना खुणावतोय मोठा विक्रम; 'नापाक' हॅरिस रौफही पाहतोय स्वप्न

Viral Video : पाकिस्तानात कसा साजरा होतो नवरात्रोत्सव? आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT