कोल्हापूर

सरूड

CD

01699
नवे पारगाव : संपर्क दौऱ्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर, आमदार राजू आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते.
...
मतदार यावेळी निश्चित बदल घडवतील
सत्यजित पाटील : निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, चावरे परिसरात संपर्क दौरा
सरुड, ता. २९ : ‘हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मला मिळत असलेल्‍या मतदारांचे समर्थन पाहून प्रतिस्पर्धी उमेदवारांना धडकी भरली आहे. दोघांच्याही निष्क्रिय कारभाराला कंटाळलेली जनता यावेळेला निश्चित बदल घडवेल,’ असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी केले. ते रविवारी निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, चावरे, तळसंदे, पाडळी, मनपाडळे, अंबपवाडी व कासारवाडी या गावांच्या संपर्क दौऱ्यावेळी बोलत होते.
सत्यजित पाटील म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जेवढ्या प्रमाणात निधी आणि पायाभूत सुविधा मिळायला पाहिजे होत्या, तेवढ्या प्रमाणात त्या मिळाल्या नाहीत. मी संपर्काला कुठेही कमी पडणारा माणूस नाही किंवा मला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. सर्वसामान्य माणूस मला थेट येऊन आपले काम सांगू शकतो. ज्यांना निवडून येण्याची गॅरंटी नाही ते आता माझ्या विरोधात पैसा आणि टीकेचा वापर करू पाहत आहेत.’ या संपर्क दौऱ्यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT