कोल्हापूर

पुरस्कार प्रदान

CD

77184

श्री दत्त शिरोळ कारखान्यास
साखर निर्यातीचा प्रथम पुरस्कार
शिरोळ ता. २१ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने २०२१-२०२२ मध्ये विक्रमी साखर निर्यात केल्याबद्दल, नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचा, देशपातळीवरील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील व विश्वजीत कदम उपस्थित होते.
पुरस्कार कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वीकारला. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते. पुरस्कार ऊस उत्पादक शेतकरी बंधूनी कारखान्यावर दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया चेअरमन गणपतराव पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT