कोल्हापूर

राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही

CD

राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही
डॉ. अशोक चौसाळकर ः शिरोळमध्ये प्रबोधन शिबिर
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. ३० ः राज्यघटना समजावून घेऊन ती टिकवून ठेवणे व त्याची अंमलबजावणी करणे ही पुढील पिढीची जबाबदारी आहे. उदारमतवादी लोकशाही, सामाजिक न्यायाचा विचार आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा विचार हा राज्यघटनेतून केला आहे. अनेक देशांत राज्यघटना बदलल्या; पण भारतात नाही. त्यामुळे आम्ही निर्धार केला तरी कोणीही राज्यघटना बदलू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षारंभानिमित्त डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन आणि समाजवादी प्रबोधिनीतर्फे आयोजित प्रबोधन शिबिरामध्ये ‘भारतीय स्वातंत्र्य लढा व राज्यघटना’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विनोद शिरसाठ होते.
दुसऱ्या सत्रात ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संविधान’ या विषयावर बोलताना सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, ‘नोकरशाहीमधील नोकर ज्यावेळी आपल्याला आपल्या समाजाचा, आपल्या जातीचा आहे असे वाटतो, त्यावेळी लोकशाहीचा पराभव झाला असे म्हणावे लागेल. त्यामुळे नोकरशाहीवर संविधान जपण्याची मोठी जबाबदारी आली आहे.’ तिसऱ्या सत्रामध्ये ‘युवकांची जबाबदारी व कर्तव्ये’ या विषयावर बोलताना पत्रकार संजय आवटे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भालबा विभुते, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, शशांक बावचकर, पुणे कमिशनर वैशाली पतंगे, दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, दादा काळे आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संजय सुतार यांनी केले. आभार संजय गुरव यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT