कोल्हापूर

विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा पूर्ततेसाठी इनरव्हील क्लब कटिबद्ध

CD

विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी
इनरव्हील क्लब कटिबद्ध
वैशाली लोखंडे : शिरटी येथे कार्यक्रम
शिरोळ, ता. १३ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आहे. या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याकरिता, शाळेला लागणाऱ्या भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी इनरव्हील क्लब नेहमीच कटिबद्ध राहील, अशी ग्वाही इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन वैशाली लोखंडे यांनी दिली.
शिरटी (ता. शिरोळ) येथील शांतीसागर विद्यामंदिर या शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी जयसिंगपूर इनरव्हील क्लबने सहकार्य केले. त्यांच्या माध्यमातून शाळेची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली. शाळेस पुस्तके ठेवण्याचे रॅक, स्वच्छतागृहासाठी पाण्याची टाकी, विद्यार्थ्यांना लागणारे खेळाचे साहित्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याबद्दल शाळेतर्फे इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोखंडे बोलत होत्या.
मुख्याध्यापिका शारदा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन इनरव्हील क्लबतर्फे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जीवनधर चौगुले यांनी शिरटी गावातील सर्व अंगणवाड्यांना खुर्ची देणार असल्याचे सांगितले. इनरव्हील क्लबने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च देण्याचे घोषित केले. या समारंभास इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वसुंधरा कोल्हे-जयसिंगपूर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शिल्पा आडदांडे, नीलम बिरनाळे, ‘स्वाभिमानी’चे सौरभ शेट्टी, अलमनीसार मुल्लाणी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत रामोशी, दीपक हुपरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT