कोल्हापूर

पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी

CD

01525, 01526
शिरोळ ः येथील बंधाऱ्याजवळ मृत माशांचा असा खच पडलेला आहे.

प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगेत मासे मृत

शिरोळ येथील प्रकार; हजारो माशांचा खच, आरोग्यास धोकादायक

शिरोळ, ता. १५ ः येथील पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले. यामुळे नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. मासे मृत्युमुखी पडल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून, याकडे प्रदूषण महामंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला होता. जलपर्णी काढण्याकरिता प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, सोमवारी (ता. १३) व मंगळवारी (१४) पंचगंगा नदीत दुर्गंधीयुक्त व रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे, मंगळवारपासून नदीपात्रातील मासे ऑक्सिजनअभावी गुदमरून मरत असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आले. यामुळे मच्छीमारांनी विनाजाळी मासे पकडण्यास सुरुवात केली. अनेकजण पोती भरून मासे नेत होते. शिवाय अनेक मृत मासे जलपर्णीतून प्रवाहाबरोबर बंधाऱ्याजवळ आले. यामुळे बंधारा परिसरात मृत माशांचा खच पडलेला आहे. दूषित काळे पाणी व मृत माशांमुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.
रासायनयुक्त दूषित पाण्याबरोबर अनेक गावांतील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. हे पाणी विषारी बनले असून, पिण्यास अयोग्यच बनले आहे. जलचरांबरोबर मानवी आरोग्यासही ते पाणी अयोग्य बनले असताना, प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

कोट
पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न शासन स्तरावरून निकाली काढण्याकरिता लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत, हे उघड आहे. प्रत्येक वर्षी लाखो मासे मृत्युमुखी पडून, तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे हे पाणी पिऊन माणसे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का?
- रामदास गावडे, शिरोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT