शिरोळ नगरपरिषदेचा प्रारूप विकास आराखडा रखडणार
शिरोळ, ता. ११ ः शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी होऊन यामध्ये शासनाच्या नगरविकास विभागाबरोबरच शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. पुढील सुनावणी जानेवारी २०२५ पर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, न्यायालयात याचिकाकर्त्यांचे म्हणणे दाखल करून घेतल्याने शिरोळ शहराचा प्रारूप विकास आराखडा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिरोळ नगरपरिषदेची २०१८ मध्ये स्थापना झाली. यामुळे नवीन शहराच्या हद्दनिश्चितीचा नकाशा तीन वर्षांत करून प्रारूप विकास आराखडा तीन वर्षांच्या आत शासनास सादर करणे बंधनकारक असताना नगरविकास खात्याकडून मुदतीत प्रारूप विकास आराखडा तयार करून तो मुदतीत प्रकाशित केल्या नाही. तसेच प्रकाशित करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये विविध त्रुटी असल्याने विनोद मुळीक व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रारूप विकास बेकायदेशीर असल्याचे कारणावरून याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. यामध्ये ॲड. धैर्यशील सुतार यांनी नगरपरिषदेने मुदतबाह्य काम करून नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार प्रारूप विकास आराखड्याची कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरपालिकेने कर्तव्यात कसूर केल्याने तसे घोषित करून, विकास आराखडा तयार करण्याचे काम नगरपालिकेकडून शासनाच्या अधिकृत प्राधिकरणाकडे वर्ग करणे कायद्यात अभिप्रेत असल्याचे न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिले. यामुळे न्यायमूर्ती गडकरी व न्यायमूर्ती खाटा यांनी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग संचालक नगररचना पुणे, मुख्याधिकारी शिरोळ नगरपरिषद यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच पुढील सुनावणी जानेवारीमध्ये पुढील सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब करत असल्याचे सांगितले.
याचिकाकर्ते विनोद मुळीक यांच्याशी संपर्क साधतात ते म्हणाले, ‘नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा पूर्णतः चुकीचा असून, अनेक त्रुटी त्यामध्ये आहेत. यामुळे उच्च न्यायालयामध्ये निश्चितच न्याय मिळेल.’
मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश नगरपरिषदेला प्राप्त झालेला नाही. यामुळे आदेश प्राप्त झाल्यानंतर यावरती भाष्य करणे उचित ठरेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.