कोल्हापूर

हसुर तंटामुक्ती अध्यक्षाकडूनचं युवकाला मारहाण.

CD

तंटामुक्त अध्यक्षाकडून मारहाण
शिरोळ, ता. ४ ः हसूर (ता. शिरोळ) येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष व त्याच्या कुटुंबीयांनी युवकाला बांबूच्या काठीने मारून जखमी केले आहे. गावातील वाद मिटवण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
हसूर येथील सुरज परगोंडा ऐनापुरे (वय २८) या युवकाला ‘आमच्याकडे पाहून थुंकलास का’ या कारणावरून तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. संबंधित युवकाला लाथाबुक्क्यांनी व बांबूच्या काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर जखमी युवकाने थेट शिरोळ पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या प्रकरणी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र आप्पाराव चौगुले, मुलगा रोहन रवींद्र चौगुले, भाऊ दिलीप आप्पाराव चौगुले व पुतण्या चिदानंद दिलीप चौगुले यांच्यावर शिरोळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

वडील समजून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार; हत्या करून जाळून फेकलेल्या मृतदेहाचे रहस्य कायम

Jintur accident news: जिंतूरजवळ भीषण अपघातात वसमतचे मामा-भाचा ठार; शहरात शोककळा, बाजार बंद

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

SCROLL FOR NEXT