03124
शिरोळ ः दत्त साखर कारखाना येथे गणपतराव पाटील, आमदार रोहित पवार यांना क्षारपड जमीन मुक्तीच्या कामाची माहिती देताना.
आमदार रोहित पवार यांनी
घेतली जमीन क्षारपडमुक्तीची माहिती
शिरोळ ता. २० ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी दत्त साखर कारखाना कार्यस्थळी सदिच्छा भेट दिली. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जमीन क्षारपडमुक्तीच्या कामाचे कौतुक करून लवकरच क्षारपडमुक्ती कामाची विस्तृत माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पवार वैयक्तिक कार्यक्रमानिमित्त शिरोळ तालुक्यात आले होते. श्री. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
उद्यानपंडित पाटील यांनी शिरोळ तालुक्यात झालेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची माहिती दिली. दहा हजार एकरांवर क्षारपड मुक्तीचा हा प्रकल्प यशस्वी झाला असून, चार हजार एकरांवर शेतकरी प्रत्यक्षात उत्पादन घेत असल्याचे सांगितले. कारखान्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना, सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, सुपर केन नर्सरी, माती, पाणी परीक्षणाचा अहवाल, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाची माहिती दिली.
यावेळी अध्यक्ष रघुनाथ पाटील, संचालक दरगू गावडे, महेंद्र बागे, अशोकराव कोळेकर, रावसाहेब भिलवडे, विजयसिंह जगदाळे, दिलीप पाटील-कोथळीकर, नितीन बागे, वरुण पाटील आदी उपस्थित होते.
03124
SRL26B03124
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.