बसवेश्वर जयंतीनिमित्त
शिरोळला पालखी मिरवणूक
शिरोळ : महात्मा बसवेश्वर यांचे विचार सर्व समाजाला मार्गदर्शक आहेत. जात पात भेद न मानता सर्वांना विश्वासात घेऊन, बसवेश्वरांच्या विचारांचा जागर उपयोगी ठरणार असल्यामुळे या कामास सर्व मदत करण्याची ग्वाही दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त, समस्त लिंगायत समाज संस्थेतर्फे पालखी मिरवणुकीचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
मनोज कुमार रणदिवे यांनी स्वागत केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविले. अमरसिंह पाटील, रघुनाथ पाटील, दरगू गावडे, राघव शेट्टी, डॉ. कुमार पाटील, प्रकाश माळी, शुभांगी फल्ले, महावीर कुंभार, अण्णासो खडके आनंदराव माळी, राजू शेनवाडे, चंद्रकांत कोरे, मनोहर फल्ले, मलगोंडा भुसेंगे, दीपाली फल्ले, अनिल कुमार वाले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.