कोल्हापूर

आंदोलन अंकुश''ची रविवारी शिरोळमध्ये ''एल्गार सभा'' धनाजी चुडमुंगे; प्रतिटन पाच हजारासाठी ठरणार आंदोलनाची दिशा

CD

‘आंदोलन अंकुश’तर्फे रविवारी
शिरोळला एल्गार सभा
पाच हजार ऊस दरासाठी लढा उभारणार

शिरोळ, ता. १३ ः उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, यासाठी आंदोलनाची पुढील दिशा एल्गार सभेत ठरविण्यात येणार आहे.
एल्गार सभा रविवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केली आहे, अशी माहिती पत्रकार बैठकीत ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली.
श्री. चुडमुंगे म्हणाले, ‘यावर्षी साखरेची टंचाई आहे. त्यामुळे साखरेला दरही चांगला मिळणार आहे, तर उसाला वाढत्या उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यावर्षी तुटणाऱ्या उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, यासाठी ‘आंदोलन अंकुश’चा लढा आहे.’
गेल्या चार ते पाच हंगामांत कारखान्यांना बाजारात साखर, मळी, बगॅसला चांगला दर मिळाल्याने कारखाने नफ्यात आहेत. नफ्यातील योग्य वाटा, कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला पाहिजे, हंगाम अडथळ्यांविना सुरू व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा असेल, तर आंदोलनाआधीच संघटनेशी चर्चा करून पाच हजार रुपये दरावर सकारात्मक निर्णय घोषित करावा, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचेही श्री. चुडमुंगे यांनी सांगितले.
यावेळी राकेश जगदाळे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, तालुकाध्यक्ष नागेश काळे, उपाध्यक्ष संभाजी शिंदे, अमोल गावडे, पोपट संकपाळ, देवेंद्र चौगुले, बाळासाहेब भोगावे, राजू आवळे, चंदू पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT