कोल्हापूर

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान

CD

आता दिव्यांगांसाठी ‘शासन आपल्या दारी’
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १६ : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन, राज्य सरकारने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य सरकारने दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींबरोबरच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र, शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र यासारखी आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग बांधवाच्या सर्व समस्यावर एकाच ठिकाणी सोडवण्यात यावीत, यासाठी या अभियानात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे. तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह, त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे.
------------------
चौकट
जिल्हास्तरीय समिती
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू आहेत. या अभियानासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
--------------
ओळखपत्र कार्यक्रमाला मिळेल गती
राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण २९ लाख ६३ हजार ३९२ दिव्यांग आहेत. त्यापैकी केवळ नऊ लाख दिव्यांगांना वैश्‍विक ओळखपत्र प्राप्त झाले आहे. उर्वरित दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या अभियानात वैश्‍विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळेल, असा विश्‍वास दिव्यांग व्यक्त करीत आहेत.
---
कोट
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान राबविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने केली पाहिजे, तरच दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे.
महेश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT