कोल्हापूर

शिरोली : डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

CD

डी.एड.कडे विद्यार्थ्यांची पाठ
भरतीचा मुद्दा केंद्रस्थानी; जिल्ह्यात ९२१ पैकी ३९१ अर्ज

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. ८ : एकेकाळी झटपट आणि खात्रीशीर नोकरीची हमी देणाऱ्या डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. राज्यात डीएड अभ्यासक्रमासाठी सर्व माध्यमांच्या ३१ हजार १०७ जागा आहेत. मात्र त्यासाठी केवळ १३ हजार ७९९ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात ९२१ जागांसाठी ३९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविल्या जात आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होत आहे. ७ जुलैला ‘चेकलिस्ट’ लागत आहे. ११ जुलैला पहिली प्रवेश यादी जाहीर होणार. अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेश मिळणार, हे निश्चित आहे. शिक्षक होण्याची ईच्छा ठेवणाऱ्या प्रत्येकास डीएड किंवा बीएड आवश्यक असते. प्रामुख्याने प्राथमिक शाळांची संख्या अधिक असल्याने डीएडसाठी झुंबड उडत असे. आता शिक्षकाची पदेच भरली गेली नाहीत. अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती होऊ शकली नाही. संचमान्यतेच्या आधारे भरती राबविल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने अनेकवेळा जाहीर केले. पण संचमान्यता प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलेले नाही. शासनाचा भरतीबाबत ठोस निर्णय नाहीच. ही स्थिती असल्याने डीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असल्याचे चित्र आहे. म्हणून प्रवेश अर्ज कमी होत चालल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले.
---
चौकट
जिल्ह्यात एक उर्दू , एक इंग्रजी माध्यामाचे तर १९ मराठी माध्यमाचे असे एकूण २१ डीएड कॉलेज आहेत. यात एकूण १०२१ प्रवेशक्षमता आहेत. त्यापैकी उर्दू व इंग्रजी माध्यमाची पूर्वीच प्रक्रिया अल्पसंख्याक विभागाकडून केली जाते, तर उर्वरित ९२१ जागांसाठी ३९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
---
कोट
शिक्षक पदासाठी डीएडबरोबर टीईटी पास होणे अनिवार्य आहे. टीईटीचा निकाल कमी आहे. तसेच शिक्षक भरतीची संधी कमी आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे.
- डॉ. आय. जी. शेख, प्राचार्य, कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT