कोल्हापूर

टोप : जलजीवन अंतर्गत जल कुंभाचे भूमीपूजन

CD

02908
टोपला जलकुंभाचे भूमिपूजन
टोप, ता. १० : जलजीवन मिशनच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेतून नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल व टोपचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास सरपंच तानाजी पाटील यांनी व्यक्त केला. जलजीवन मिशनअंतर्गत येथील जलकुंभाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातुन टोपसाठी जलजीवन मिशनच्या सुधारीत नळपाणी पुरवठा योजनेतून ४ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून माळवाडी १ लाख ७६ हजार लिटर तर पाटील टेक भागासाठी ५२ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. अंतर्गत पाईपलाईनची कामे सोलर पंप योजनेतून होणार आहेत.
जलकुंभाचे भूमिपूजन सरपंच पाटील यांच्या हस्ते केले. यावेळी उद्योगपती नंदकुमार मिरजकर, बाळासाहेब चव्हाण, श्रीरंग तावडे, श्रीपती पाटील, विजयसिंह घोरपडे, पिलाजी पाटील, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल काटकर, दिलीप मुळीक, दीपक पाटील, रमेश पाटील, स्नेहा जिरगे, सरस्वती पुजारी, सविता कुरणे, मानसिंग गायकवाड, शिवम भोसले, दिलीप पाटील, बाळासो कोळी, विजय पाटील, अजित चव्हाण, उत्तम पाटील, राजू कोळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT