शिरोली पुलाचीत
रक्तदान शिबिर
शिरोली पुलाची : महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटनेतर्फे घेतलेल्या रक्तदान शिबिरात ७३ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष अंजुम देसाई यांच्या हस्ते झाले. अॅड. बाळासाहेब पवार प्रमुख उपस्थित होते.
असंघटित कामगारांचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सभासदांनी योगदान द्यावे, असे आवाहन अध्यक्ष अंजुम देसाई यांनी केले. कोल्हापुरातील अर्पण ब्लड बँकेतर्फे दात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अन्सार देसाई, सरचिटणीस बाळासाहेब कांबळे, महिला शहराध्यक्षा सुप्रिया गोरे, जिल्हा उपाध्यक्ष कुमार घाटगे, प्रथमेश कांबळे, तालुकाध्यक्ष प्रतीक कांबळे, तालुका उपाध्यक्ष लाजरस कदम यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार केला. पांडुरंग जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष मोहसीन पोवाळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.