कोल्हापूर

टोप : कासारवाडी जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर

CD

03570

कासारवाडीत वैद्यकीय
कचरा उघड्यावर
टोप, ता. ३० : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील जैवविविधतेने संपन्न असलेल्या भागात रस्त्याच्या बाजूलाच दवाखाना, मेडिकलमधील वैद्यकीय कचरा उघड्यावरच टाकला आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वन्यप्राणी आणि परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अपप्रवृत्तीविरुद्ध कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कासारवाडीच्या पश्चिमेस रस्त्यालगत कुरण नावाच्या भागात रुग्णालयातील वापरलेले इंजेक्शन, सलाईन बॉटल, सुया, कापूस, औषधांच्या बाटल्या, हॅन्डग्लोव्‍हज्‌, डायपर, जखम साफ करण्यासाठी वापरण्यात आलेले कापूस असा जैववैद्यकीय कचरा टाकलेला आहे. वापरण्यात आलेले वैद्यकीय साधने आणि वस्तूही कचऱ्यातून संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ शकतो. या भागातून ये-जा करणारे नागरिक व वन्यजीवांसाठी हा कचरा धोकादायक आहे. प्रशासनाने याचा पंचनामा करून वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी आग्रही मागणी होत आहे. येथील वैद्यकीय व्‍यावसायिक जैववैद्यकीय कचरा इचलकरंजीतील देतात. त्यामुळे येथे कचरा टाकतो कोण, याबाबत चर्चा होत आहे. याबाबत तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
---
कोट
मेडिकल वेस्ट वारंवार उघड्यावर टाकले जात आहे. यांच्यावर प्रशासनाने कडक कायदेशीर करावी.
- अच्युत खोत, सरपंच, कासारवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT