कोल्हापूर

शिरोली : रंगोत्सव आणि समृद्धी उपक्रम

CD

विद्यार्थी, शिक्षकांसाठी रंगोत्सव - समृद्धी उपक्रम
शालेय शिक्षण विभागाचा निर्णय : एकता, देशभक्तीसह अनुभवात्मक शिक्षणाचा हेतू

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १३ : प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा उपक्रम पुरस्कृत केला आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती व एकता या भावनांची जागरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे. समृद्धी उपक्रम नववी ते बारावी वर्गाच्या स्तरावर असून, अनुभवात्मक शिक्षण हा मुख्य हेतू आहे.
प्राथमिक स्तरावरील रंगोत्सवात अनुभवात्मक अध्ययन आधारे कृती राज्यस्तरावर सादर करायची आहे. माध्यमिक स्तरावर राष्ट्रीय पातळीवर कला उत्सव कार्यक्रम आहे. शिक्षकांना अभ्यासक्रमच्या क्षेत्रात सर्वोत्तम कला एकात्मिक अध्ययनशास्त्रीय पद्धती यावर आधारित अध्ययन व अध्यापन कृती सादर करावयाची आहे. जिल्हास्तरावर जिल्हानिहाय प्राप्त कृती व्हिडिओचे परीक्षण करून रंगोत्सव कार्यक्रमाचे पाच तर समृद्धी कार्यक्रमाचे तीन कृती व्हिडिओ सादर करावे लागणार आहेत. त्याचे विभागीय स्तरावर परीक्षण होणार आहे. रंगोत्सव उपक्रमात विभागीय पातळीवार प्रत्येक विभागातून तीन उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक यांचे संघ तसेच समृद्धी उपक्रमात एक उत्कृष्ट संघ निवडला जाणार आहे. रंगोत्सव उपक्रमात राज्य पातळीवर आठ विभागांतील २४ संघांना कृती सादर करण्‍यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे, तर समृद्धीचे आठ संघ सहभागी होणार आहेत. समृद्धी उपक्रमात राज्यस्तरावर उत्कृष्‍ट ठरणाऱ्या संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. रंगोत्सव उपक्रम राज्यापुरताच मर्यादित आहे. रंगोत्सव उपक्रमात अनुभवात्मक शिक्षणाच्या आधारे विद्यार्थ्यामध्ये सहयोग, स्वयंपुढाकार, स्वयंदिशा, स्वयंशिस्त, संघभावना, जबाबदारी, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. समृद्धी उपक्रम राष्ट्रीय पातळीवर प्रथमच आयोजित केला जात आहे. यामध्ये अध्यापनशास्त्र महत्त्‍वाचे आहे. वर्गातील उपक्रम व कृती याचा अध्ययनाशी थेट संबंध असला पाहिजे. अध्ययन अनुभवात चिकित्सक विचार व २१ व्या शतकातील कौशल्ये याचा पण विचार समृद्धी उपक्रमात होणे अपेक्षित आहे.
---
चौकट
निमंत्रित संघांना प्रवास भत्ता, निवास व भोजन
राज्यस्तरावर रंगोत्सव व समृद्धी उपक्रमाचे आयोजन ११ व १२ जानेवारी २०२५ करण्यात येणार आहे. यावेळी रंगोत्सव व समृद्धी उपक्रमातील निमंत्रित संघांना प्रवास भत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येणार आहे.
---
कोट
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुरस्कृत केलेल्या उपक्रमामुळे शिक्षकांना अनुभव व कौशल्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग घ्यावा.
-एस. डी. लाड, जिल्हाध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : इराणी जहाजावर पाणबुडीने केलेल्या हल्ल्यात १०१ जण बेपत्ता, ७८ जण जखमी

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT