कोल्हापूर

शिरोली : यात्रा पुरवणी लेख सलीम महात

CD

शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा
सर्वांगीण विकास साधणार ः महात


शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि वेगवान विकास साधण्याचा ठाम निर्धार जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची आशा व्यक्त होत असून, शिरोली, नागाव, टोप प्रभाग क्रमांक ६, सोनार्ली वसाहत आणि संभापूर या सर्व भागांचा संतुलित विकास करण्यावर भर दिला जाणार असल्याचे महात यांनी सांगितले.

जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजनांमधून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेत प्रलंबित कामांना गती देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ‘जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे भांडवल आहे. या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी अहोरात्र काम करणार आहे,’ असे सलीम महात यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघातील वाढत्या वसाहतींना पाणी, रस्ते, वीज आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये, यासाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहत आणि राष्ट्रीय महामार्गामुळे मतदारसंघाचे महत्त्व वाढत असून रोजगार आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळत आहे. महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या (सर्व्हिस रोड व पूरक सुविधा) कामाबाबत नागरिकांच्या सूचनांनुसार आवश्यक बदल करण्यात आले असून हे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.
आरोग्य सेवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार आणि तत्काळ आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.
‘शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघ स्वयंपूर्ण व्हावा, प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचावा आणि हा भाग प्रगतीचा आदर्श ठरावा, हा माझा ध्यास आहे,’ असे सलीम महात यांनी सांगितले.
जनतेचा पाठिंबा, नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि विकासाची स्पष्ट दिशा यांच्या जोरावर मतदारसंघ प्रगतीच्या नव्या उंचीवर झेपावेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
- - -
चौकट :
निराधारांसाठी योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत
संजय गांधी निराधार योजना समितीअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि गरजू नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधत कार्यक्षम यंत्रणा उभारली जाईल. कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, ही जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडू,’ असेही महात यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT