ध्यास विकासकामांचा
आस जनकल्याणाची
पंचायत समितीच्या विविध योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, हीच आपली प्राथमिकता असल्याची ठाम भूमिका शिरोली पंचायत समिती सदस्य कमल प्रकाश कौंदाडे यांनी व्यक्त केली.
शिरोली पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिरोली गावातील चार प्रभागांचा समावेश असला, तरी केवळ त्या प्रभागांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे कौंदाडे यांनी स्पष्ट केले. “पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे त्यांनी सांगितले.
पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये घरकुल योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), महिला व बालकल्याण योजना, अपंग व निराधार सहाय्य योजना, तसेच शिक्षण व आरोग्यविषयक उपक्रम यांचा समावेश आहे. या सर्व योजनांची माहिती मतदार संघात पोहोचवून पात्र लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात लोकांच्या आयुष्यात बदल घडवतील, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद आवश्यक आहे. आम्ही गावपातळीवर बैठका, जनजागृती मोहीम आणि थेट नागरिकांशी संवाद साधत आहोत,” असे कौंदाडे यांनी अधोरेखित केले.
तसेच, शिरोली गावात पायाभूत सुविधा उभारणी, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यांना प्राधान्य देत विकासाचा वेग वाढविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा हक्काचा लाभ मिळवून देणे हीच खरी लोकसेवा आहे, असे सांगत त्यांनी विकासाच्या कामात सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
एकूणच, समावेशक विकास आणि सर्वांपर्यंत योजना हा मंत्र अंगीकारून कमल कौंदाडे यांचे नेतृत्व शिरोली पंचायत समिती मतदारसंघात नवा विकासदृष्टिकोन निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.