‘सावली केअर’तर्फे
आजपासून कार्यशाळा
साने गुरुजी वसाहत ः पिरवाडी (ता. करवीर) सावली केअर सेंटरतर्फे उद्यापासून (ता. २२) ''शोध स्वतःचा'' विषयावर मोफत कार्यशाळा होणार आहे. रोज सायंकाळी सहा ते सात वेळेत होणारी कार्यशाळा २४ मेअखेर सुरू राहील. कार्यशाळेत चंद्रशेखर फडणीस मार्गदर्शन करतील. सावली केअर सेंटरच्या सरस्वती कलामंच व्यासपीठावर कार्यशाळा होणार आहे. ‘शोध स्वतःचा’ कार्यशाळेत स्वतःवर काम कसे करायचे, याचे मार्गदर्शन होणार आहे. मोफत असणाऱ्या कार्यशाळेचा लाभ महिला, नोकरवर्ग, व्यावसायिक, तरुण वर्गांने घ्यावा, असे आवाहन डॉ. किशोर देशपांडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.