कोल्हापूर

प्लास्टिक मुक्त कोल्हापूर साठी ज्येष्ठ नागरिक संघ व अवनी चा सहभाग

CD

01537

ज्येष्ठ नागरिक संघ, अवनितर्फे
प्लास्टिक निर्मूलनाविषयी प्रबोधन

साने गुरुजी वसाहत ता. १ ः दैनिक ‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘प्लास्टिकमुक्त कोल्हापूर’ चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था व अवनी संस्थेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील नगरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सुरुवातीला प्लास्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामाविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. प्लास्टिक कचरा संकलित करून ठेवणार, प्लास्टिक उघड्यावर टाकणार नाही व इतरांनाही टाकू देणार नाही, प्लास्टिकचा वापर करणार नाही, भाजीपाला व किराणा मालासाठी कापडी पिशव्या वापरेन, अशी शपथ घेतली. क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर जेष्ठ नागरिक सेवा संस्था व अवनी संस्थेतर्फे नाना पाटील नगर परिसरात प्लास्टिक कचरा संकलित करून ठेवण्यासाठी गोण्यांचे वाटप केले. त्यामध्ये नागरिकांनी आठवडाभर प्लास्टिक कचरा गोळा करून ठेवणे व त्यानंतर अवनीतर्फे वाहन पाठवून परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा केला जाणार आहे. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नलवडे, उपाध्यक्ष गजानन विभूते ,सदाशिव पुंडे, चंद्रकांत बागडी, रामचंद्र गायकवाड, रमेश गुरव, सुरेश गुरव, राजू पाडळकर तसेच ‘अवनि’च्या अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जैनुद्दीन पन्हाळकर व सहकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT