कोल्हापूर

मिशन रोजगार'' अंतर्गत दोनशे प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरण -''पीएम विश्वकर्मा'' मधून बार्बर, गोल्डस्मिथ प्रशिक्षण.

CD

01906
‘मिशन रोजगार’अंतर्गत
२०० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र

साने गुरुजी वसाहत, ता. ८ : ‘मिशन रोजगार’अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजनेमधून बार्बर, गोल्डस्मिथ व मेसन प्रशिक्षण घेतलेल्या २०० लाभार्थ्यांना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर कॅम्पस येथे कार्यक्रम झाला. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू आहे. यावेळी पूजा पाटील म्हणाल्या, ‘मिशन रोजगार उपक्रमांतर्गत युवक -युवतीना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. विश्वकर्मा योजनेमधून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार भविष्यात व्यावसायिक म्हणून पुढे येतील असा विश्वास वाटतो.’ डी. वाय. पाटील ग्रुपने तरुणाईला रोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याविषयी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखेनगर कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समन्वय शीतल गणेशाचार्य, ?मिशन रोजगार’चे समन्वय राजन डांगरे, प्रशिक्षक प्रियांका मोहिते, दीपाली देसाई,यास्मिन मोमीन, समिना जमादार, वैष्णवी कोरडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mahayuti Meeting : कोल्हापूर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदे होणार निश्चित

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Latest Marathi News Live Update : भांडुप बस अपघात प्रकरणात मोठा खुलासा

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

SCROLL FOR NEXT