02049
संकल्प संकुलात विज्ञान प्रदर्शन
साने गुरुजी वसाहत, ता. ७ ः आपटेनगर परिसरातील संकल्प माध्यमिक विद्यालय, इंदुमती जाधव विद्यालय, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यावतीने आज शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन झाले. संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ॲड. टी. जी. हालके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी बनवलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांनी वॉटर कुलर, चांद्रयान तीन, ज्वालामुखीचा उद्रेक रिमोट बोट, सौर चूल, जलशुद्धीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, आर्मी सिक्युरिटी गेट, स्मार्ट ॲम्ब्युलन्स, मेंदूचे कार्य, एटीएम, रोबोटिक हॅन्ड, जलचक्र, पवनचक्की, मायक्रोस्कोप, हवेचा दाब, डॉल्बीचे परिणाम, बीजांकुरण व जलचक्र यासारखे अनेक प्रयोग सादर केले होते. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती . विज्ञान प्रदर्शनासाठी विषय शिक्षिका सुषमा सुतार, तेजस्विनी स्वामी, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी पाटील, इंदुमती जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, अवधूत कुलकर्णी, अनिता पाटील, सुनीता पाटील, राजेश कोंडेकर, सागर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. पिंटू नाईक यांनी स्वागत केले. यादू भोये यांनी आभार मानले. यावेळी संभाजी पाटील, दत्ता पाटील, संभाजी चौगुले, यशवंत रानगे यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.