कोल्हापूर

चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले

CD

01690

चांदोलीः धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले.
...


चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले

तुरुकवाडी, ता.२६ : चांदोली धरणाचे आज सकाळी ११ वाजता दोन दरवाजे उघडले असून वारणा नदीपात्रात २४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे वारणा धरण ८२.२८ टक्के भरले आहे.
वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. धरण पाणी पातळी ६२०. ५० मीटरवर पोहचली आहे. पाणी पातळी धरणाच्या सांडवा पातळीपर्यंत पोहचल्याने धरण प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. धरण पाणलोट क्षेत्रात २० मिमी तर एकूण १०२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातून १५९२६ क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. वीज निर्मीती केंद्रातून ९११ तर दोन वक्राकार दरवाजांद्वारे १५४५ क्युसेक्स असा एकूण २४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरु आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
वारणा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी गोरख पाटील म्हणाले,‘ वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरणाचे अन्य दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. वारणा नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांनी भोंदू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Crime : चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू; 500 रुपये न दिल्याने पोटात केले होते वार, दहा तास मृत्यूशी झुंज अयशस्वी

LPG Gas : गॅस तुटवड्यात काळाबाजार तेजीत; कोल्हापुरात घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर उघड

SCROLL FOR NEXT