भेडसगाव पतसंस्थेला अडीच कोटी नफा
तुरुकवाडी : भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी ५० लाखांचा नफा झाल्याचे संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांनी सांगितले. संस्थेने २०६ कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. कर्ज वाटपात १५.२६ टक्के वृद्धी होऊन १४२ कोटी ४९ लाखांचे कर्जवाटप केले आहे. सोने तारण व ठेव तारण ६५ कोटी ९२ लाख आहे. एकूण ठेवी २०६.५२ कोटी असून रोख व बँक शिल्लक रु. ५.७७ कोटी, गुंतवणूक रु.८६.१२ कोटी, ठेवतारण कर्जे रु. ६.७३ कोटी व सोनेतारण कर्जे रु.५९.३५ कोटी आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. ८६ कोटी १२ लाख गुंतवणूक इतर बँकांत आहे. भागभांडवल व निधी २२ कोटी ३५ लाख असून १० टक्के लाभांश दिला जातो. ३०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. राज्यात २१ शाखा आहेत. पनवेल व साळवणला शाखा सुरू होणार आहेत. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग डांगे, संचालक विठ्ठल पाटील, आबा लगारे, राजू कुसळे, विलास परीट, संग्राम पाटीलसह संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.