कोल्हापूर

टेंबलाई मंदिराकडे जाणारी वाट खडतरच

CD

85435

टेंबलाई मंदिराकडे
जाणारी वाट खडतरच

सकाळ वृत्तसेवा

उचगाव, ता. २३ ः कोल्हापूरच्या पूर्व बाजूला असणाऱ्या त्र्यंबोलीदेवी टेकडीकडे जाणारा त्र्यंबोली टेकडी कमान ते त्र्यंबोली मंदिरापर्यंत रस्ता पूर्णपणे उखडला आहे. सर्वत्र खडी पसरली आहे. त्यामुळे देवीकडे जाणारा मार्ग खडतर बनला आहे. तरी देवस्थान समिती महापालिका यांनी हा रस्ता करावा, अशी भाविकांची मागणी होत आहे
कोल्हापूरच्या पूर्वीस असणाऱ्या नवदुर्गापैकी एक असणारे त्र्यंबोली मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे येथील अनेक लोक दर्शनासाठी येतात; परंतु त्र्यंबोली कमानीपासून मंदिरापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडून खडी पसरली आहे. दोन ते तीन मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जाताना खूप त्रास होत आहे. मोकळ्या हवेत फिरण्यासाठी सकाळी टेकडीवर आबालवृद्धांची गर्दी असते. त्यांनाही येथे अडचणीचे ठरत आहे. तरी रस्ता लवकरात लवकर करावा, अशी मागणी भाविक व टेंबलाईवाडी विक्रमनगर परिसरातील लोक करत आहेत

कोट
आम्ही नेहमीच नियमित सकाळी परिसरात फिरायला येतो. देवीच्या दर्शनासाठीही सहकुटुंब येतो; परंतु येथील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. महापालिका, देवस्थान समितीने हा रस्ता त्वरित डांबरीकरण करून भाविकांची गैरसोय दूर करावी.
- अमित पाटील

उचगाव ः त्र्यंबोली टेकडी ते मंदिरापर्यंतचा उखडलेला रस्ता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT