कोल्हापूर

संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनेची पेन्शन उचगाव मध्ये मिळावी - करवीर तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

CD

00613

ज्येष्ठांच्या योजनांची
पेन्शन उचगावला द्या

ठाकरे गटाची ‘केडीसी‘च्या व्‍यवस्थापनाशी चर्चा

उचगाव, ता. १३ ः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखेमध्ये कर्मचारी अपुरे असल्याचे सांगत उचगांवमधील ज्येष्ठांना पेन्शन उचगांवमध्ये मिळणार नसल्याचे अधिकारी सांगतात. तर मार्केट यार्ड शाखेमार्फत पूर्वी सुरू असलेली ज्येष्ठांच्या पेन्शन वाटपाची व्यवस्था उचगांवमध्ये करावी, अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकेच्या दारामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा देणारे निवेदन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांना दिले.
संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी योजनांव्दारे नागरिकांना पेन्शन मिळते. गांधीनगर, वळीवडे, उचगांव, रईकर कॉलनी, टैबलाईवाडी, सदरबाजार, विक्रमनगर, बापट कॅम्प आदी भागातील ४००० ते ५००० पेन्शन धारकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि., शाखा मार्केट यार्ड, कोल्हापूर या बँंकेत शासनामार्फत पेन्शन जमा केली जाते. पण पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन मिळत नाही. महिन्याच्या १५ ते २० तारखेनंतर बँकेत पेन्शन वाटप केली जाते. त्यावेळेस बँकेमध्ये मोठया प्रमाणात पेन्शनधारकांची गर्दी होते. पेन्शनधारक म्हटला की, वयोवृध्द, आजारी अशा लोकांना मार्केट यार्ड शाखेत येताना थेट बससेवा नसल्यामुळे रिक्षा करून जातो. ३ ते ४ जण पेन्शनधारक एकत्र जातात. सकाळी ११ वाजता आले की त्यांना साधारण ३ ते ४ वाजता पेन्शन भेटते व रिक्षावाला प्रत्येकी १०० ते १५० रूपये भाडे आकारतो. त्यातच एखादा दिवस हेलपाटा झाला की पेन्शनमधील रिक्षासाठी प्रत्येकी २०० ते ३०० रूपये खर्च होतात. तसेच पैसे जमा होऊन ते तहसीलदार कार्यालयाकडून आले नाही, असा प्रकार घडला की, पेन्शनधारक तहसीलदार कार्यालय गाठतो. बँक व तहसील कार्यालय असा त्याचा प्रवास होतो. शासनाची पेन्शन बँकेचे टेन्शन अशी अवस्था पेन्शनधारकाची होऊन तो हेलपाटे मारून खचून जातो. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले, कर्मचारी अपुरे असल्यामुळं पेन्शन उंचगावमध्ये येऊन वाटप करणे अडचणीचे होत होते, परंतु आपल्या मागणीचा विचार करता उंचगावला येऊन शिवसेनेच्या मदतीने मार्केट यार्ड शाखेमार्फत पेन्शन वाटप करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शरद माळी, अजित चव्हाण, सागर पाटील, रामराव पाटील, अजित कांबळे उपस्थित होते.

देसाई मित्रपरिवारातर्फे
सौंदत्ती भाविकांसाठी प्रसाद
कोल्हापूर : सौंदत्ती ( कर्नाटक) येथील डोंगरावर रेणुकादेवीच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून बसेसने दाखल होणाऱ्या भाविकांना दौलत जयकुमार देसाई व मित्र परिवाराच्या वतीने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळील लक्ष्मी मंदिर येथे प्रसादाचे वितरण करून प्रतिवर्षीप्रमाणे यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने रेणुका देवीच्या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहनाने सौंदतीकडे जातात. दौलत देसाई मित्र परिवारातर्फे त्यांना श्रीफळ, शाल, लाडू प्रसादाचे वितरण केले. हा सामाजिक उपक्रम १५ वर्ष सुरू आहे. महिला भाविकांसाठी सौंदती डोंगरावर प्रसाधनगृहाची सोय केली आहे. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे पेटून कौन्सिल सदस्य दौलत देसाई, माजी परिवहन सभापती अजित मोरे, कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर, प्रशासनाधिकारी पृथ्वीराज मोरे, प्राचार्य आर. बी. भूयेकर, प्राचार्य टी. ए. पोवार, माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर, एन. टी. पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, एम. व्ही. बारवडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते. सूत्रसंचालन निसार मुल्ला, अनिल पाटील तर आभार के. आय. जमादार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT