कोल्हापूर

सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने लेख

CD

निष्ठावंत नेता

ज्यांच्या श्वासात, ध्याना-मनात काँग्रेस ठासून भरली आहे, शाहू-फुले-आंबेडकर यांचा कृतिशील विचार व काँग्रेस विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचे काम महाराष्ट्रभर करणारे राज्याच्या राजकारणातील युवकांचा बुलंद आवाज असणारे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा आज वाढदिवस...
----------------

१२ एप्रिल दिवस काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात राहणारा दिवस. कारण त्या दिवशी आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांना वह्यारूपी दिलेल्या शुभेच्छा वसामान्य विद्यार्थ्यांना आशेचा किरण देतात. त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात शिवाजी विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून केली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या संचालक पदापासून आमदार, मंत्री ते विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सामान्य माणूस ‘अजिंक्यतारा’वर माझे काम होणारच म्हणून जातो. एखादा सामान्य कार्यकर्त्याला लांबूनच सतेज पाटील यांनी हाक मारावी, त्याने काम सांगावे व काही वेळातच काम झाल्याचे समाधान मानत आनंदाने जावे हे चित्र अजिंक्यतारा कार्यालय व त्यांच्या यशवंत निवास येथे सातत्याने दिसते.

अमोघ वक्तृत्वशैली
सतेज पाटील यांच्याकडे प्रभावी वक्तृत्वशैली आहे. इंग्रजी, हिंदीवर त्यांचे प्रभुत्व आहे. अमोघ वक्तृत्व शैलीतून समोरच्या माणसाला घायाळ करण्याची ताकद त्यांच्या शब्दात आहे. राजकीय कार्यक्रमात राजकीय भाषण तर सामाजिक कार्यक्रमात राजकारणाविषयी एकही शब्द न उच्चारता केलेले सामाजिक भाषण लोकांना प्रभावित करते.
शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कामगारांचा, विजेचा वा शक्तिपीठ महामार्गाचा असो; राज्यात वाढणारी गुन्हेगारी असो या प्रत्येक प्रश्नावर सतेज पाटील सडेतोडपणे भूमिका मांडतात. आक्रमक शैलीमुळे अनेकदा मंत्रीही भांबावून जातात. भाषणातून एकही असंसदीय शब्द त्यांच्या तोंडून जात नाही हेच त्यांच्या विधान परिषदेतील कामाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये काँग्रेसषाने दिलेली जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडत आहेत.
प्रभावी विरोधी पक्षाचा नेता म्हणून चांगली कामगिरी ते बजावत आहेत. राजकारणामध्ये त्यांनी अनेकांना ग्रामपंचायत सदस्या पासून सरपंच ,पंचायत समितीचे पदाधिकारी जिल्हा परिषद पदाधिकारी, विविध संस्थेमध्ये संचालक असे अनेक पदे त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला दिलेली आहे जो कार्यकर्ता अखंडपणे संकट काळात मागे राहतो व त्याच्यातील टॅलेंट ओळखून प्रत्येकाला त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी संधी देतात.
सामान्य कार्यकर्त्याला विश्वास देणे, त्याच्यात लढण्याचे सामर्थ्य उभा करणे व प्रसंगी त्याच्या मागे ताकदीनिशी हिमालयासारखे उभा राहणे व त्याच्या लढाईत सेनापतीची भूमिका पार पडणे व विजयासाठी मायक्रो प्लॅनिंग करणे हे काम सतेज पाटील मुरब्बीपणे करतात.

निवडणुकीतील मायक्रो प्लॅनिंग
कोल्हापूर महानगरपालिकेत ३५ नगरसेवक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. जिल्हा परिषदेमध्ये १५ जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच पंचायत समिती सदस्य काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

काँग्रेसचा आश्वासक चेहरा
महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचा आश्वासक चेहरा म्हणून सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेस नेते सोनियाजी गांधी व राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विश्वासू शिलेदारांपैकी ते एक आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्यात त्यांचे कसब आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळापासून ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत जबाबदार मंत्री म्हणून छाप पाडली. काँग्रेसची राजकारणात पीछेहाट झाल्यानंतर अनेकजण काँग्रेस सोडून अन्य पक्षांत गेले. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेससोबत राहून अनेक पदे मिळवली त्यांनी एका रात्रीत पक्ष बदलला. परंतु सतेज पाटील यांनी पक्षनिष्ठा कायम राखली. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे केले. राजकारणासह समाजकारणात उत्तरोत्तर प्रगती होत राहून सतेज पाटील यांचे कार्य महाराष्ट्रासह देशभरात पोहोचावे याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...

- प्रमोद ढेकळे, उचगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT