कोल्हापूर

विमानतळावर टर्मिनल कामाचा आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून आढावा

CD

03386
नवीन टर्मिनल सप्टेंबरपर्यंत पूर्ण
अधिकाऱ्यांची माहिती; विमानतळ सल्लागार समितीची बैठक

उजळाईवाडी, ता. १६ ः आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. यावेळी नवीन टर्मिनलचे बांधकाम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी दिली. प्रवाशांना योग्य सोयी-सुविधा द्याव्यात, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.
कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या प्रथम सत्र बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक ऑनलाईन सहभागी झाले. बैठकीत न्यू टर्मिनल बिल्डिंग, नेव्हिगेशन डीव्हीओआर, ६४ एकर जमीन अधिग्रहण, फ्लाईट कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी, वैद्यकीय सुविधा, पॉवर ग्रीड लाईन, कचऱ्याची समस्या, केएमटी बस सेवा, स्ट्रीट लाईट, आदी विषयांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी विकासकामांची माहिती दिली. टर्मिनलचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. इंडिगो एअरलाईन्स, स्टार एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांना कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक मदत देण्यास प्रयत्नशील आहे. वैद्यकीय सुविधेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलकडून आवश्‍यक मदतीचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. पॉवर ग्रीड, स्ट्रीट लाईट, घनकचरा व्यवस्थापनेसंबंधी त्यांनी सूचना केल्या.
बैठकीनंतर त्यांनी न्यू टर्मिनल बांधकामाची पाहणी केली. ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या फॅब्रिकेशन, ग्लास वर्क सुरू आहे. येथील सर्व गोष्टी भविष्याचा विचार करून, प्रवाशांना अडचणी होऊ नयेत अशा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सल्लागार समिती सदस्य विशाल चोरडिया, विकास माने, विद्यानंद मुंढे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पोलिस निरीक्षक राजेंद्र माने, चीफ ऑफ एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसर राजेंद्र मस्के, विजय यादव, जयेश संकलेचा, हिमांशू रावत, इंडिगो एअरलाइन्सचे विशाल भार्गव, स्टार एअरलाइन्सचे नंदकुमार गुरव उपस्थित होते.
जमीन अधिग्रहणासाठी स्वतंत्र अधिकारी नेमा
सध्या महिन्याला चार नाईट लँडिंग सुरू आहेत. विमानतळास डीव्हीओआर उपकरणाची गरज आहे. यामुळे एअर ट्रॅफिक हॅण्डलिंग क्षमता वाढेल. यासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे. त्यात अडचणी येत असल्याने स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून याची जबाबदारी द्यावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT