कोल्हापूर

विज्ञान शाखेमध्ये करियरच्या अमर्याद संधी ; प्रा. प्रशांत देसाई

CD

03909
गडमुडशिंगीत गुणवंतांचा
सत्कार, करिअर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी, ता. १० ः वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच विज्ञान शाखेसाठी अनेक क्षेत्रांत प्रगतीच्या अमर्याद संधी आहेत. विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने विज्ञान शाखेला प्राधान्य देणे हिताचे ठरेल, असे मत प्रा. प्रशांत देसाई यांनी व्यक्त केले. गडमुडशिंगीत धनगर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी इतर शाखांमध्येही संधी असल्याचेही नमूद केले.
अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची सखोल माहिती देत कठोर परिश्रमाच्या जोरावर उत्तुंग यश मिळते, असेही त्यांनी सांगितले. प्रा. प्रदीप भोसले यांनी, उच्च शिक्षणाला संस्कारांची जोड असल्यास आयुष्य सुखी आणि आनंदी होऊ शकते असे सांगत विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या नेत्रातील सुख पाहण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन शिक्षण घेत नैतिक आचरणाचे महत्त्वही सांगितले. यावेळी गडमुडशिंगीसह परिसरातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सत्कार झाला. दत्तात्रय नेर्ले यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन रवी पुजारी तर सुनील पुजारी यांनी आभार मानले. यावेळी गणपती पुजारी, चंद्रकांत नेर्ले, गजानन रानगे, अजय वाघमोडे, महादेव वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब रानगे, म्हाळू रेवडे, करसिद्ध खिलारी, भगवान पुजारी, सतीश हजारे, अशोक पुजारी, धुळसिद्ध पुजारी, विशाल पुजारी, बाळासाहेब देशमुख विद्यार्थी पालक व समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT