कोल्हापूर

उत्तूरला सलोखा प्रमाणपत्र वाटप.

CD

03559
उत्तूर : मुमेवाडी येथील खातेदारांना सलोखा योजना पंचनामा प्रमाणपत्रांचे वाटप करताना तहसीलदार विकास अहिर. शेजारी गटविकास अधिकारी एच. डी. दाईंगडे, आदी.

उत्तूरला सलोखा प्रमाणपत्र वाटप
उत्तूर : महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेंतर्गत येथील कृष्णाजी रामचंद्र माद्याळकर व ईश्‍वर कल्लाप्पा मांग यांना आजरा तालुक्यातील पहिले सलोखा योजना पंचनामा प्रमाणपत्र वाटप तहसीलदार विकास अहिर व गटविकास अधिकारी एच. डी. दाईंगडे यांच्या हस्ते झाले. तलाठी कार्यालय उत्तूर येथे कार्यक्रम झाला. मंडल अधिकारी प्रवीण खरात यांनी स्वागत केले. या वेळी तहसीलदार अहिर म्हणाले, ‘‘विविध न्यायालयात जमिनीचे हक्क, ताबा, मोजणी, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदींमुळे तसेच अतिक्रमणामुळे भाऊबंदकीमध्ये उद्‌भवलेली वादाची अनेक प्रकरणे प्रास्तवित आहेत. ती आपसात मिटावीत यासाठी शासनाने सुरू केलेली सलोखा योजना एक चांगला पर्याय असून, आपापसांत, गटागटांत वाद असलेल्या जास्तीत जास्त लोकांनी एकमेकांच्या सहमतीने या योजनेचा लाभ घ्यावा.’’ या वेळी महसूल अव्वल कारकून दिलीप जाधव, सहायक गटविकास अधिकारी पाटील, स्नेहल कुंभोजकर, संजय कांबळे, युवराज पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. तलाठी कल्याण सोनवणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT