कोल्हापूर

आरदाळमध्ये सामुहिक गारवा

CD

03733
आरदाळ ः सरपंच रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंबील घुगऱ्यांच्या दुरडींची मिरवणूक काढण्यात आली.
--------
आरदाळमध्ये सामुहिक गारवा
उत्तूर, ता. ६ ः आरदाळ (ता.आजरा) येथे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नविन पाण्याची टाकीसह पाईपलाईन व जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. गावाला नियमितपणे पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या विहीरीचा उपयोग होतो त्या विहिरीला व जॅकवेलच्या कामाला गावातील महिलांनी आंबील घुगऱ्यांचा कार्यक्रम सरपंच रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाला.
पाणी योजनेसाठी ७५ लाखांचा निधी मंजूर आहे. योजनेचे काम सुरू असून जॅकवेल विहीरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जॅकवेलचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच रुपाली पाटील व उपसरपंच विद्याधर गुरव यांनी सांगितले. ग्रामदैवत भैरीदेव मंदिरापासून आंबील व दुरड्यांची मिरवणूक वाजत गाजत जॅकवेलपर्यंत नेली. तेथे सहभागी महिलांचे स्वागत करून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. विहिरीवर काम करणारे मजूर, ट्रॅक्टर, जेसीबी चालक, ग्रामपंचायत कर्मचारी जालिंदर डवरी, विनायक कांबळे यांचा सत्कार  झाला. उपसरपंच विद्याधर गुरव यांनी लक्ष घालून जॅकवेलचे काम चांगल्यापद्धतीने केल्याबद्दल त्यांचाही सपत्नीक सत्कार केला. शिवाजीराव जाधव, अंबाजी तोरस्कर, सूर्यकांत पाटील, शिवाजी गुरव, विठ्ठल पोवार, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT