कोल्हापूर

त्रिवेणीच्या पुरस्कांराचे बहिरेवाडीत वितरण

CD

5917, 5918
पेरणोली ः वझरे जंगलात आढळलेला शेकरू.

दुर्मीळ शेकरू प्राण्याचे
वझरेच्या जंगलात अस्तित्व

सकाळ वृत्तसेवा
उत्तूर, ता. ७ ः महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला दुर्मीळ शेकरू (उडती खार) प्राण्याचे अस्तित्व वझरे-पेरणोलीच्या जंगलात आढळून आले आहे. या परिसरातील जंगले समृद्ध झाल्याने अनेक दुर्मीळ प्राणी, पक्षी, कीटक व फुलपाखरे आढळून येत आहेत. शिकारीवर आलेली बंदी आणि त्यावर वनखात्याने केलेली कडक उपाययोजना यामुळे प्राणी व पक्षी बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत.
पेरणोली जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई यांनी या सुंदर प्राण्याचे झाडांवर बागडतानाचे छायाचित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. शेकरू ही खारींची एक विशेष प्रजाती आहे. शेकरू झाडांवर राहते. आंबा, आंबाडा, किंजळ, रानबिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, उंबर यांसारख्या उंच झाडांवर राहणे आणि याच झाडांची फळे खाणे आवडते. झाडाच्या काटक्या आणि मऊ पाने वापरून घुमटाकार घरटे बांधतात. ते सूर्योदयाबरोबर घरट्याबाहेर पडतात. दिवसभर ठराविक झाडांवर अन्न खातात आणि दुपारी विश्रांती घेतात. सूर्यास्तापूर्वी ते पुन्हा घरट्यात परततात. वझरेच्या जंगलात गवे, बिबटे, हरीण, रानकोंबडी, पिसेरा, पटकुऱ्या, मुंगूस, ससे, माकड, वानर, हरेल, घुबड, भैरी ससाणा, साळिंदर, धनेश पक्षी यांसारख्या विविध वन्यजीवांचे अस्तित्व आहे. शेकरू दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन होणे हा एक सुखद अनुभव असतो.
.........................
त्रिवेणी संस्थेच्या पुरस्कांराचे वितरण
उत्तूर ः येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेच्या वतीने बहिरेवाडी (ता. आजरा) येथे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक रामभाऊ देशपांडे, ॲस्टर आधार कोल्हापूरचे डॉ. अजित कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीपाद जोशी यांना अनंतराव आजगावकर स्मृती पुरस्काराने, दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने समीर श्रीहरी कुलकर्णी (गडहिंग्लज), पद्मषण डॉ. जे. पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने स्वाती उपाध्ये, राजाराम माने, वैशाली हातकर, बसलिंग मगदूम, आप्पा पाटील, रवींद्र महापुरे, राजश्री सुतार, दीपक कांबळे, जनार्दन देशमुख, दिनकर गुरव, अनंत भोगण, बाबूराव वरपे, प्रणिता कुलकर्णी, सुमन जाधव, शशिकला मोरे यांना, तर त्रिवेणी जीवन गौरव पुरस्काराने डॉ. शिवशंकर उपासे, वसंत पाटील, बी. के. पुजारी, जे. ए. पाटील, शैलेश पाटील, जयसिंगराव सावंत, भरत सुरसे, गोपाळ सबनीस, राजश्री गाडगीळ यांना, तर प.पू. बाबा आमटे व साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने रमजानभाई अत्तार यांना गौरविण्यात आले. यावेळी सरपंच रत्नजा सावंत, पंचायत समिती सदस्य विकास चोथे आदी उपस्थित होते. प्रा. श्रीकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले. टी. के. पाटील यांनी स्वागत केले. संपत सावंत यांनी आभार मानले.
.............................
05920
बेलेवाडी ः जीवाणू खताच्या वाटपप्रसंगी कृषी अधिकारी. सोबत शेतकरी.

बेलेवाडी, बहिरेवाडीत जीवाणू खताचे वाटप
उत्तूर ः आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी येथील भावेश्वरी नैसर्गिक शेती उत्पादक गट व बहिरेवाडी येथील शिव शंभो नैसर्गिक शेती उत्पादक गटातील शेतकऱ्याना महाराष्ट्र शासन आत्माअंतर्गत जीवाणू खताचे अनुदानावर वाटप करण्यात आले. जीवाणू खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार कृषी योजनेंतर्गत अनुदानावर वाटप करते. ही खते जमिनीची सुपीकता वाढवून पिकांची उत्पादन वाढवतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी सहायक कृषी अधिकारी शिवेंद्र भोसले, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर व दोन्ही गावांतील गटातील शेतकरी उपस्थित होते.
....................

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT