कोल्हापूर

भादवणला शवशितगृहाची पालकमंत्री आबिटकर यांचेकडे मागणी.

CD

भादवण आरोग्य केंद्रात
शव शीतगृह सुरू करा

उत्तूर, ता.२० ः भादवण (ता. आजरा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात शव शीतगृह सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना शाखा भादवणच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले.
भादवण आरोग्य केंद्रात शव शीतगृह उभारल्यास भादवणसह परिसरातील ३० ते ३५ गावांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय कौलगे-कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील कौलगे, करंबळी हिरलगे या गावांनाही त्याचा लाभ होणार आहे.
आई-वडील गावी असतात आणि त्यांची सर्व मुले, नातेवाईक नोकरीनिमित्त बाहेरगावी शहरात राहतात. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर मुले व नातेवाईक येईपर्यंत मृतदेह आजरा, गडहिंग्लज किंवा उत्तूर येथील रुग्णालयात ठेवावे लागतो. त्यामुळे उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रात शव शीतगृह सुरू करावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, शाखाप्रमुख श्रीकांत देवरकर, उपशाखाप्रमुख राहुल देसाई आदींच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT