कोल्हापूर

उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पातील संयुक्त मोजणीला विरोध

CD

उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पातील
संयुक्त मोजणीला विरोध

उत्तूर ता. ४ ः उचंगी प्रकल्पाची दोन मीटर उंची वाढवून प्रकल्पग्रस्तांना उध्वस्त करण्याचा घाट शासनाकडून सुरू आहे.या संयुक्त मोजणीला प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे. दडपशाहीने मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोध करू, असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
चाफवडे, जेऊर व चितळे गावांमध्ये ही मोजणी होईल. कृष्णा कोरे महामंडळ पुणे येथे प्रकल्पग्रस्तांच्या समवेत उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत चर्चा होऊन उचंगी प्रकल्पाच्या खोऱ्यात पडणारा पाऊस आणि लाभ क्षेत्रात पुरेल इतके पाणी याचा अभ्यास करून प्रकल्पाची दोन मीटर उंची कमी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता २००१ ते २००२ या दरम्यान महामंडळाने २ मीटर उंचीच्या वाढविण्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रकल्पग्रस्तांना अमान्य आहे. या २ मीटर उंचीमुळे चाफवडे, जेऊर आणि चितळे गावातील ७० ते ७५ एकर जमीन पाण्याखाली जाणार असून प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. उचंगी क्षेत्रातील उपलब्ध लाभ क्षेत्र व पाणीसाठा पुरेसा आहे यापूर्वी प्रकल्पामध्ये गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्रचनाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. जमीन वाटप झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नकाशे दिले गेलेले नाहीत. चार शेतकऱ्यांना आजही जमीन वाटप केलेली नाही. जमिनीकडे जाण्यासाठी दळणवळणाचे रस्ते उपलब्ध नाहीत. यासह अनेक बिकट समस्या प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला आहेत. असे असतानाही पुन्हा दोन मीटर उंची वाढवून प्रकल्पग्रस्तांना उद्ध्वस्त करण्याचा घाट शासनाकडून सुरू आहे. शासनाने ही मोजणी करू नये; अन्यथा प्रकल्पग्रस्त स्त्री-पुरुषांसह होऊ घातलेल्या संयुक्त मोजणीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विरोध करतील, असा इशाराही दिला आहे. निवेदनावर धनाजी दळवी, विजय भडांगे, संजय तर्डेकर, विश्वास भडांगे, सुनील धडाम, निवृत्ती बापट यांच्यासह प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, जनशक्तीचा विजय : PM मोदी

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT