कोल्हापूर

वडणगे ग्रामसभेत पर्यायी स्मशानभूमी प्रश्न पुन्हा रेंगाळला ?

CD

पर्यायी स्मशानभूमीचा
प्रश्न वडणगेत रेंगाळला

ग्रामसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा

वडणगे, ता. ३० : येथील ग्रामसभेत उपस्थित असलेल्या इतर समाजातील नागरिकांनी विरोध केल्याने पर्यायी स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा रेंगाळला आहे. दरवर्षी पुराच्या काळात अंत्यविधी रस्त्यावर शेड मारून करावा लागतो. तात्पुरत्या स्वरूपात स्मशानभूमी उभारणीचा विषय कृती समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाचा विषय दादासो शेलार यांनी उपस्थित केला होता. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता शहाजी पाटील होत्या.
ग्रामसेवक राजेंद्र भगत यांनी सभेत मागील प्रोसिडिंग वाचन केले. सतीश पाटील यांनी, बिगरशेती असलेल्या कॉलनीमधील रिकाम्या जागांची माहिती दिली. पिराजी संकपाळ यांनी जागा ग्रामपंचायतीने हस्तांतरित करून घ्याव्यात; अशी सूचना केली. त्यावर संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी वेळेत कॉलनीतील रिकाम्या जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित कराव्यात, अन्यथा त्या कॉलनीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचा ठराव झाला. ग्रामपंचायतीने कॉलन्यांचा बिगरशेतीचा आदेश रद्द करण्याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्याचे ठरविले. दोन कोटी मंजूर असलेल्या पार्वती मंदिराच्या हॉलचे काम बंद का पडले आहे, याची माहिती घेऊन ठेकेदारावर कारवाईची सूचना अमर चौगले यांनी केली. त्यावर माहिती घेऊन कळवले जाईल, असे ग्रामसेवकांनी सांगितले. मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक ठराव मासिक सभेऐवजी गावसभेत करावेत, असे माजी उपसरपंच दीपक व्हरगे यांनी सांगितले. पार्वती मंदिरासह तलावाजवळील असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवाव्यात; अन्यथा उपोषणाचा इशारा निवास देवणे यांनी दिला. पाडलेली स्वच्छतागृहे बांधावीत; असे सचिन बोने-पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शिबिर घेणाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावही झाला.
उपसरपंच सविता धनगर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात जौंदाळ, ग्रामपंचायत सदस्य नितीन साखळकर, जयवंत कुंभार, संगीता नांगरे, स्वाती नाईक, रूपाली जौंदाळ, स्वप्नाली नाईक, गणेश पोवार, बाजीराव पाटील, वैशाली पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT