कोल्हापूर

शोभायात्रेतून झळकला हिंदू ऐक्याचा संदेश; वडणगेत संमेलन उत्साहात

CD

02646
वडणगेत विराट हिंदू संमेलन
वडणगे, ता. ६ : येथे सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू संमेलन उत्साहात झाले. यावेळी काढलेल्या शोभायात्रेत अठरापगड जाती व बारा बलुतेदारांसह हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पार्वती मंदिरातून प्रारंभ झालेली शोभायात्रा पार्वती गल्ली, छत्रपती शिवाजी चौक, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, आंबे गल्ली, दुकान रोड मार्गे ग्रामपंचायत पटांगणात दाखल झाली. मिरवणुकीत हलगी व धनगरी ढोल यांचा गजर होता. शोभायात्रेत भारत माता, अर्धनारीश्वर (शंकर-पार्वती), बालशिवाजी व मावळे, संभाजी महाराज, जिजामाता, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, विठ्ठल-रुक्मिणी, स्वामी समर्थ, चिले महाराज, बाळूमामा यांसारख्या महान व्यक्तींच्या वेशभूषेत बालकलाकार सहभागी झाले होते. कलश घेतलेल्या महिला, वारकरी संप्रदाय आणि शांतीदूत मर्दानी आखाड्याचे मावळेही सहभागी झाले. मर्दानी आखाड्याच्या मावळ्यांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.
डॉ. स्मिता गंभीर यांनी जातीभेद विसरून एकत्र राहण्याचे आवाहन केले. शिवशंभू विचार मंचचे ज्ञानेश्वर पठाडे म्हणाले, ‘‘हिंदू समाजाचे संघटन बळकट व्हावे.’’ ईश्वरबुवा रामदासी यांनी धर्म, संस्कार आणि राष्ट्रसेवेची जाणीव ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रांत सदस्या अॅड. सुप्रिया दळवी, सरपंच संगीता पाटील, उपसरपंच जयवंत कुंभार, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजीत पाटील, पंचायत समिती सदस्य बळीराम कळके, बाजीराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मोहन पाटील व प्रसाद कोतमिरे यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT