वडणगेतील मुस्लिम बांधवातर्फे
शिरोलीतील घटनेचा निषेध
वडणगे : शिरोली पुलाची येथे घडलेल्या संतापजनक घटनेचा वडणगे येथील मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. घटनेतील गैरप्रकार हे माणुसकीला काळिमा फासणारे असून गुन्हेगाराला कोणताही धर्म नसतो. त्यामुळे अशा प्रवृत्तींना समाजाने थारा देऊ नये, असे मत मुस्लिम बांधवांनी व्यक्त केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, पीडित मुलींना न्याय मिळावा, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली. यावेळी मुन्वर मुल्ला, यासीन मुल्ला, सलीम मुल्ला, फिरोज मुल्ला, आदिल मोमीन, यासीन गार्दी, शहानवाज मुल्ला, आझाद मुल्ला, तोशिप मुजावर, सूरज मुल्ला आदी उपस्थित होते..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.